

Late Dr. M. B. Jadhav ( कै. डॉ. महिपती भिकाजी जाधव ): founder of Eklavya Agro Chemicals, Pune.
डॉ. एम. बी. जाधव: ऊस पिकासाठी केलेले संशोधन:
1. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावमध्ये मधून प्रसारित झालेल्या CO 7219 पासून ते CO ८६०३२ पर्यंत सर्व ऊसाच्या जातींना खतमात्रा देण्याच्या मूळ शिफारशी दिल्या. या शिफारशीनुसारच संपुर्ण पश्चिम व मध्य महाराष्ट्रामध्ये नत्र, स्फुरद, पालाश व सुक्ष्मअन्नद्रव्ये दिली जातात. ऊसाला लागणारी खते व त्यासाठी जमिनीची राखावी लागणारी निगा यावर पाडेगाव येथे सुमारे २8 वर्षांचे संशोधन.
2. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे ऊस पिकाच्या खोडव्यामध्ये पाचट न पेटवता तसेच ठेऊन उत्पादन वाढवण्याचे मूलभूत तंत्रज्ञान सर्वप्रथम विकसित केले. १९८३ पासून ऊसाचे पाचट ठेऊन मिळणारे उत्पादन, त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी, त्याच्या मर्यादा, फायदे व तोटे यावर संशोधन केले. या तंत्रज्ञानावरिल अनेक संशोधनपर लेख प्रसिध्द.
3. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावमध्ये शास्त्रज्ञ असताना साखर कारखान्यांमधील प्रेसमड केकवर प्रक्रिया करुन त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले.
4. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे ऊस पिकाच्या खोडव्यामध्ये पहारीने खते देण्याची पद्धत विकसित केली.
5. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे ऊसामध्ये कॅल्शियम सिलिकेट या खनिजाचा खत म्हणून वापर करण्याचे महाराष्ट्रामध्ये प्रथम मूलभूत संशोधन.
6. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम माती परिक्षण केल्यानंतर अपेक्षित उत्पादनासाठी आवश्यक खते देण्याची शिफारस केली. या शिफारशीनुसारच संपुर्ण पश्चिम व मध्य महाराष्ट्रामध्ये जमिनीमधील अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खते दिली जातात.
7. अपेक्षित ऊस उत्पादन वाढीसाठी तत्कालिन शेतकऱ्यांकडे असणाऱ्या उपलब्ध भांडवलानुसार खतमात्रांच्या शिफारशी तयार केल्या.
8. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे ऊस पिकाबरोबरच हिरवळीची पिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले.
9. २०१० साली एकलव्य अग्रो केमिकल्सची स्थापन केली. ऊसाच्या बियाणेप्रक्रियेपासून ते ऊस वाढीच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आवश्यक असलेल्या घटकांचा अभ्यास करून विक्रमी उत्पादन काढण्यासाठी अनेक प्रभावी उत्पादने शेतकऱ्यांसाठी वाजवी दरात उपलब्ध करुन दिली आहेत. एकलव्यची ही उत्पादने महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश व गुजरात पासून आफ्रिकेपर्यंत पोहोचली आहेत.
10. २०१९ मध्ये होय आम्ही शेतकरी या शेतकऱ्यांच्या समुहामधील हुशार, अनुभवी व यशस्वी शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सर्व सामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास ऊसासाठी गन्ना मास्टर किट तयार केले. या किटमध्ये ५ वेगवेगळे प्रोडक्ट्स असून ऊसाच्या सुरुवातीच्या काळातील वाढीसाठी मोठ्या प्रमाणात मदत करतात व प्रतिएकर ऊस उत्पादन वाढते.

Education:
• BSc Agriculture - First Class - 1974
• MSc Agriculture - First Class with distinction - 1976
• Ph.D.(Soil Science) - First Class with distinction - 1998
Publications:
• Scientific: 20
• Technical: 52
• Extensions: 63
• Books: 05


Experience:
• BSc & MSc in Agriculture, PhD in Soil Science & Chemistry.
• Worked as a Scientist in Central Sugarcane Research Station,
Padegaon as Soil Physicist, from 1977 to 2000.
• Expert in Sugarcane Nutrition, Breeding & Soil Science.
• Total 40 years of experience.
• Guided BSc (Agriculture) & MSc (Agriculture) Students in
College of Agriculture, Pune as an Associate Professor
for 9 years.
• 40 years of Experience of consulting farmers.
Currently 1000s of farmers are under guidance.

• Author/Co-Author of various books, Research Papers, Scientific & Technical Publications on Farming.
• Wrote many articles on Sugarcane in weekly/monthly Publications & Newspapers.
• Expert in Usage of Sugarcane industry by-products, other Fruit crops & Vegetables farming. • Won various awards for
Research Papers and Books.
• Active role in development of Co 86032 the most popular sugarcane variety in India.
